Nanded
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्फूर्ती पवळेला कास्यपदक
तामसा : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, तसेच धुळे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चिकाळा तालुका हादगाव येथील स्फूर्ती पवळे हिने कांस्यपदक मिळवले असून या यशाबद्दल परिसरातील क्रीडा रसिकांसह सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
स्फूर्ती इ.बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून शालेय अभ्यासक्रमासह क्रीडा क्षेत्रातही अधिक आवड असल्याने कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती कराटे प्रशिक्षण घेत आहे. दि २ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देवपूर धुळे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून ५३० कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत स्फूर्ती पवळे ही कास्यपदकाची मानकरी ठरली. या यशाबद्दल प्रशिक्षक बालाजी गाडेकर मुख्याध्यापक शिक्षक यासह क्रीडा रसिकांनी तिचे अभिनंदन केले आहे.