Connect with us

Nanded

परभणी घटने प्रकरणी तामसा शहर कडकडीत बंद

Published

on

भोकर : परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणानंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा दि. १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या संविधान प्रेमी तसेच आंबेडकरवादी संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या बंदला  १०० टक्के प्रतिसाद मिळाला़. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी बाजारपेठेतील आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात संविधान प्रेमींनी पुकारलेल्या बंदला तामसा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

परभणी घटने प्रकरणी तामसा शहर कडकडीत बंद

File photo

तामसा येथील डॉ. आंबेडकर चौकात मयत तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहण्यात आली. सदरील प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच कुटुंबातील एका सदस्यास कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन स. पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष जयकिन रावळे, बालाजी महाजन, आनंदराव घंटालवार, शंकर मेंडके, शेख सलीम चौधरी, शेख युनूस पाशा, बोधीवृक्ष कदम, अंकुश जाधव, अनिल शेळके,खाजा मस्तान कुरेशी,सुभाष बासटेवाड, नागोराव कदम, निळू पाटील, मिलिंद जाधव, माधव नारेवाड, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Nanded

परभणी शहरातील घटनेच्या निषेधार्थ वंचितचे हदगाव तहसीलदारांना निवेदन

Published

on

राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना सेवा समर्पण परिवाराचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 

हदगाव : परभणी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव तालुका शाखेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

परभणी येथील घटनेनंतर समाजातील संविधान वादी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून भारतीय संविधान विरोधी शक्तींकडून वारंवार विविध वक्तव्य केले जात असल्याने समाजातील काही समाजकंटक हेतू पुरस्पर संविधानाची विटंबना करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर घटना निंदनीय व निषेधार्ह असून संविधानाचा वारंवार अवमान करणाऱ्या विरोधात कठोरातील कठोर कायदा करून तो अमलात आणण्यात यावा,सदरील प्रकरणी दोषीविरुद्ध कठोर शासन व्हावे तसेच परभणी शहरात कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांकडून बौद्ध वस्त्यांमधील महिला व मुलांवर होत असलेले अमानुष अत्याचार त्वरित थांबवावेत. सदर प्रकरणातील खरा सूत्रधार शोधण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांमधून आंबेडकरी तरुणांचे भविष्य वाचवावे इत्यादी मागण्यांचे निवेदन वंचित आघाडीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यामार्फत शुक्रवारी दुपारी देण्यात आले.

 

यावेळी तालुका अध्यक्ष हिदायतखान पठाण यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राम नरवाडे जिल्हा सदस्य शंकरराव काळबांडे तालुका उपाध्यक्ष मुकिंदा नरवाडे रमेश खिल्लारे चंद्रमुनी मुनेश्वर बबन भालेराव ता. महासचिव संदीप दवणे दशरथ तीव्हळे,रंजीत बगाटे, रमेश डोणेराव,ज्ञानेश्वर थोरात हे सर्व तालुका पदाधिकारी व दिलीप राठोड,ॲड.धम्मपल पाईकराव,गौतम कदम,धर्मराज गायकवाड,कैलास तलवारे,भगवान सोनाळे,राम सोनाळे ,सदाशिव पाईकराव,कमलबई मुनेश्वर,शांताबाई काळबांडे,पौर्णिमा सावते,रमाबाई कांबळे,छायाबाई गायकवाड,क्रांती गायकवाड,सिंधू कांबळे,अश्विनी गायकवाड,भीमराव वाठोरे,विनायक वाठोरे,रवी मुनेश्वर, गौतम आवटे, बानाजी वाढवे, धम्मपाल वाढवे, भगवान सोनाळे शिवराम मुनेश्वर विनोद कदम अरविंद भोरे,सचिन काळे,तुषार कांबळे सह हदगाव तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व संविधान प्रेमी उपस्थित होते.

Continue Reading

Nanded

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्फूर्ती पवळेला कास्यपदक

Published

on

तामसा : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, तसेच धुळे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चिकाळा तालुका हादगाव येथील स्फूर्ती पवळे हिने कांस्यपदक मिळवले असून या यशाबद्दल परिसरातील क्रीडा रसिकांसह सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

 

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्फूर्ती पवळेला कास्यपदक

 

स्फूर्ती इ.बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून शालेय अभ्यासक्रमासह क्रीडा क्षेत्रातही अधिक आवड असल्याने कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती कराटे प्रशिक्षण घेत आहे. दि २ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी देवपूर धुळे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून ५३० कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत स्फूर्ती पवळे ही कास्यपदकाची मानकरी ठरली. या यशाबद्दल प्रशिक्षक बालाजी गाडेकर मुख्याध्यापक शिक्षक यासह क्रीडा रसिकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading

Nanded

हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 80 हजार रुपये जब्त

Published

on

हदगाव(प्रतिनिधी)-हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार चाकी गाडीला तपासण्यासाठी थांबविले असता त्यात असणारा माणुस गाडीतील बॅग घेवून पळाला आणि आपली ओळख नाही अशा घरात जावून बेड रुमखाली लपून बसला. तरी पोलीसांनी ती रक्कम जप्त केली आहे आणि तपासणीसाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.

 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सध्या सर्वात जास्त नामांकित असलेल्या महेंद्र कंपनीच्या थार गाडी क्रमांक एम.एच.26 सीएम 9991 ला पोलीसांनी आणि महसुल विभागाच्या पथकाने थांबवले. त्यांना त्या गाडीची तपासणी करायची होती. पण गाडी थांबवून गाडीतील माणुस आपल्या हातात एक बॅग घेवून पळाला.तेंव्हा पोलीस आणि महसुल पथक त्याच्या मागे पळाले. तो अनेक गल्यांमधून पळत एका घरात शिरला. पोलीस पथक आणि महसुल पथक तेथे पोहचले. तेंव्हा त्या घराच्या मालकाने एवढ्यात आमच्या घरी कोणीच आले नाही असे सांगितले.

 

पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची मेहनत घेणाऱ्या पोलीसांनी त्या घराची तपासणी केली. तेंव्हा त्या घराच्या बेडमधील पलंगाखाली एका माणुस बॅग घेवून लपलेला होता. त्याला पाहताच पोलीसांपेक्षा जास्त त्या घराच्या लोकांची अवस्था वाईट झाली. पण पुढे त्या घरातील लोकांशी त्या बॅगवाल्या व्यक्तीचा काही संबंध नाही. हे सिध्द झाले. तेंव्हा पोलीसांनी ती बॅग आणि तो माणुस आपल्यासोबत घेवून गेले. त्याचे जयसिंह धनंजय शिंदे (24) रा.शास्त्रीनगर नांदेड, अमोल रामराव आडे (30) रा.देविनगर तांडा हदगाव या दोघांना ताब्यातघेतले असून त्या बॅगमध्ये 7 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम आहे आणि चार चाकी गाडी किंमत 15 लाख रुपये असा एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

त्याच्या चार चाकी गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते कागदपत्र, बॅनर, कोणाचे आधार कार्ड सापडले नाही. सध्या पोलीसांनी जप्त केलेली गाडी आणि 7 लाख 80 हजार रुपये निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहेत. तसेच या संदर्भाची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पण तेथील आमचे माहितगार सांगतात तो व्यक्ती सांगत होता की, हे पैसे कंत्राटदाराचे आहेत. म्हणजे आता तो कंत्राटदार कोण, पैसे कोठे जात होते, कोठून आणले होते, कोणाला द्यायचे होते. या प्रश्नांची उत्तरे शोधणे पादर्शक असलेल्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे काम आहे.

Continue Reading

Trending

Copyright © 2017 LokSamvad. Powered by WordPress. Editor - Rahul Kadam