Bhokar
राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना सेवा समर्पण परिवाराचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
भोकर, (प्रतिनिधी) : सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
सेवा समर्पण परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त मागील तीन वर्षांपासून सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या विभुतीना पुरस्कार दिला जातो. यावर्षी मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी आणि गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.३ जानेवारी रोजी श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथे होणाऱ्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनात खा. रविंद्र चव्हाण, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, ना. हेमंत पाटील, आ. राजेश पवार, आ. रामराव पाटील (म्हैसा) स्वागताध्यक्ष शिरिष देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या वेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख, बाळासाहेब पाटील रावणगावकर, मारोतराव कवळे, गोविंदराव सिंधीकर, डॉ यु. एल. जाधव, नं. द. तुप्तेवार, प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण, संजीव कुळकर्णी, प्रकाश भिलवंडे, प्रभाकर कानडखेडकर, नामदेव आयलवाड, पृथ्वीराज तौर, गोविंद पा. गौड, सुरेश बिल्लेवाड, पांडुरंग देशमुख,गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, गणेश कापसे, अशोककुमार मुंदडा यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समर्पण परिवार च्या वतीने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले…
Bhokar
परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी भोकर शहरात कडकडीत बंद
भोकर : परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आक्रमक झालेल्या संविधान प्रेमी संघटनांनी पुकारलेल्या भोकर बंदला व्यापारी बांधवांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला़. सकाळपासूनच शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.
परभणी येथेमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्या नंतर आंबेडकरी पक्ष संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आंदोलन केले . त्यामुळे विविध आरोपाखाली पोलिसांनी अनेक तरुणांना आरोपी केले होते. यात सोमनाथ सुर्यवंशी या युवकासही पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्याची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच तेथेच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलीस प्रशासनाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनातील दोषींवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दि. १६ डिसेबर रोजी आंबेडकरी संघटनांकडून भोकर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला भोकर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़.आज सकाळपासूनच भोकर शहरातील बाजारपेठ बंद ठेऊन बंद यशस्वी केला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पित केली त्यानंतर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील संविधानवादी विविध जाती धर्माचे लोक सामील झाले होते. ‘अमर रहें अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे ‘ अशा जोरदार घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेव्हा येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका सदस्य शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. यानंतर झालेल्या सभेचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे यांनी केले.संपादक उत्तम बाबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, बहुजन नेते नागनाथ घिसेवाड, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड, रमेश गायकवाड, निळकंठ वर्षेवार, सुलोचनाताई ढोले भीमराव दुधारे, भीम टायगर सेनेचे ता अध्यक्ष प्रतीक कदम , देवा हटकर, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी विचारपीठावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तौसिफ़ इनामदार,बी आर पांचाळ, रमेश गायकवाड, आदी मान्यवरांसह एम आय एम पक्षाचे जुनेद पटेल, परवीन शेख, ,आनंदीबाई चुन्गुरवाड, सुरेखा माळे, सुरेखा गजभारे, गायकवाड बाई, मनोज गिमेकर, दत्ता डोंगरे, युवा नेते विक्रम क्षीरसागर,जयभीम पाटील, सुनील कांबळे, माणिक जाधव,सतीश जाधव, पॅंथर ता अध्यक्ष असित सोनुले, निखिल हंकारे, संदीप गायकवाड, भीमराव हनवते, संजय जळपतराव, दिलीप पोतरे, शिवाजी गायकवाड, प्रसाद शहाणे, पत्रकार रमेश गंगासागरे, सिद्धार्थ जाधव, शेख लतीफ, संभाजी कदम,गजानन गाडेकर, आर के कदम, शंकर कदम, यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि राठोड मॅडम ,पोउपनि बाचेवाड,पो उपनि. राम कराड, पो. उपनि आवटे,पोहे.कॉ. नामदेव जाधव, देवकांबळे, प्रमोद जोंधळे, गाडेकर, आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गायकवाड यांनी केले.
Bhokar
प्रस्थापितांची गुलामगिरी संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या – सुजात आंबेडकर
भोकर : प्रस्थापित पक्षातील राजकीय पुढार्यांची तिसरी पिढी राजकारणात पुढे येत असून आपण बहुजन त्यांचे गुलाम झालो आहोत. परंतु आता ही गुलामगिरी संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचितचे स्टार प्रचारक सुजात आंबेडकर यांनी केले.
भोकर येथे 15 नोव्हेंबर रोजी सुजात आंबेडकर यांची सभा
वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार एडवोकेट अविनाश भोसीकर आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश राठोड यांच्या प्रचारार्थ दि. १५नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांवर प्रखर हल्ला चढवला. उपस्थित मतदारांना संबोधित करताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटवून दिली. आपल्या ताटात काही पाडून घ्यायचे असेल तर येथील वंचितांसाठी स्वतंत्र खानावळ निर्माण करावी लागणार असून आपलेच वाढेकरी निवडून आणावे लागतील त्यासाठी प्रस्थापितांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीतील आपल्या हक्काच्या भोसीकर व सुरेश राठोड या उमेदवारांना निवडून आणा असे आवाहन केले.
लोकसभेचे उमेदवार एडवोकेट अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष राजेश पालमकर, सर्वजीत बनसोड, शेख रहीम आदींनीही आपले विचार मांडले. यावेळी उपरोक्त मान्यवरांसह तालुका अध्यक्ष दिलीप राव, आनंदराव एडके, राहुल एडके, सुभाष तेले, अशोक राठोड, गणपत जाधव आदी बहुसंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
Bhokar
भोकर येथे 15 नोव्हेंबर रोजी सुजात आंबेडकर यांची सभा
भोकर: वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभा उमेदवार अॅड. अविनाश भोसीकर व भोकर विधानसभेचे उमेदवार सुरेश राठोड यांच्या प्रचारार्थ, शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रचार सभा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आली. असून सभेला पक्षाचे स्टार प्रचारक तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह सर्वजीत बनसोड ( राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ), नवनाथ वाघमारे (ओबीसी नेते ), राजेश हत्तीअंबिरे पालमकर ( जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दि. १३ नोव्हेंबर रोजी नांदेड रोड स्थित पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तिकीट देता काय तिकीट..? Assembly Elections Maharashtra
विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात एकूण २५ उमेदवार आपले नशीब आजमावत असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत असल्याने त्यास मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून उपरोक्त मान्यवर सभेला संबोधित करणार आहेत. वंचितचे उमेदवार राठोड यांनी मतदार संघातील बंधू-भगिनींना
सदरील सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या सभेनंतर उपरोक्त मान्यवरांची अर्धापूर येथे जाहीर प्रचारसभा होणार आहे.
Farooq Ahmed Gains Momentum in Nanded as Public Turns Towards VBA
-
Maharashtra5 months ago
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने
-
Nanded5 months ago
तिकीट देता काय तिकीट..? Assembly Elections Maharashtra
-
Bhokar4 months ago
भोकर येथे 15 नोव्हेंबर रोजी सुजात आंबेडकर यांची सभा
-
Maharashtra5 months ago
2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
-
Bhokar5 months ago
महाराष्ट्र आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा – डॉ. किन्हाळकर
-
Maharashtra5 months ago
अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..??? – महाराष्ट्र विधानसभा
-
Nanded4 months ago
माजी खासदार सुभाष वानखेडे यांची आज हिमायतनगर मध्ये सभा
-
Bhokar4 months ago
प्रस्थापितांची गुलामगिरी संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या – सुजात आंबेडकर